मुंबई, ११ सप्टेंबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे, ही मुख्य मागणी घेऊन गेल्या १३ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे यांच्या काही मागण्यांचा विचार करत शिंदे-फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात एक शासन निर्णय म्हणजे जीआर देखील काढला. मात्र हा जीआर त्यांना मान्य नसल्याचे म्हणत त्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहेत. दरम्यान, सध्या महाराष्ट्रात कोणत्या जातींना किती आरक्षण आहे तुम्हाला माहितीये का? एसी म्हणजे अनूसुची जातीला१३ टक्के, एसटी म्हणजे अनूसुची जमातीला ७ टक्के, ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीयांना १९ टक्के, विमुक्त आणि भटक्या जातींचे ४ प्रवर्ग मिळून ११ टक्के, एसबीसी म्हणजे विशेष मागास प्रवर्ग यांना २ टक्के असे एकूण ५२ टक्के आरक्षण महाराष्ट्रात होतं. मात्र सध्या त्याची काय आहे स्थिती?