आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगे पाटलांनी लक्ष्मण हाकेंना काय दिला सावधगिरीचा सल्ला?

| Updated on: Jun 21, 2024 | 5:18 PM

जालन्याच्या वडीगोद्री गावात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाचा आज नऊवा दिवस आहे. राज्य सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे.

Follow us on

सरकारने आतापर्यंत आम्हाला पाणी पाजलं आता तुम्हालाही पाणी पाजतील, असं वक्तव्य करत मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. सरकारकडून मराठा समाज आणि ओबीसी समाजाची फजिती सुरू आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे म्हणताय आम्ही ओबीसी समाजात आलो आहोत आणि सगेसोयऱ्यांच्या आधारे आम्ही ओबीसीमध्ये पूर्ण घुसणार आहोत तर दुसरीकडे सरकार म्हणतंय ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, नेमकं खरं कोण बोलतंय? असा सवालच लक्ष्मण हाके यांनी केला आहे. जालन्याच्या वडीगोद्री गावात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाचा आज नऊवा दिवस आहे. राज्य सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली आहे. या दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला त्यावेळी ते बोलत होते.