माकड, बेवड्या, येडपट… छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांची जुंपली; कोणी कुणाला काय म्हटलं?
आधीच माकड त्यात मद्य प्याला', अशा शब्दात मनोज जरांगे यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. तर पिऊन पिऊन किडन्या किडल्या त्या आधी सांभाळ, अशी खोचक टीका करत ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
मुंबई, १८ डिसेंबर २०२३ : भिवंडीतील ओबीसी मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. ‘जरांगे आमची काय लायकी काढतो. आधीच माकड त्यात मद्य प्याला’, अशा शब्दात मनोज जरांगे यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. तर पिऊन पिऊन किडन्या किडल्या त्या आधी सांभाळ, अशी खोचक टीका करत ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. ओबीसी मेळाव्यात बोलत असताना भुजबळ म्हणाले, जरांगे आमची लायकी काढतो काहीही बोलतो. मला बोलतो येवल्याचा येडपाट्या आहे. काहीही बोलचो. आमची लायकी तू काय पाहतो, काय तुझी हिंमत, तू तुझी तब्येत सांभाळ बेवड्या पिऊन तुझ्या किडन्या किडल्या त्या आधी सांभाळ…गोळ्या मारणार अशी धमकी देतो. काय तुझी जादागिरी.. असे म्हणत एकेरी उल्लेख भुजबळांनी जरांगेंवर केला. तर जरांगे यांनी भुजबळांच्या टीकेला काय दिलं उत्तर?