मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, मराठा आरक्षणावर तोडगा निघण्याची शक्यता, बैठकीत नेमकं काय घडलं?
मनोज जरांगे यांच्यासोबत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार.
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्य शिष्टमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा आरक्षणा संदर्भात चर्चा करण्यात आली. ही चर्चा सकारात्म झाल्याची माहिती मिळत आहे. बैठकीनंतर थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा ह्या जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे लागल्या आहेत. मराठा आरक्षणावर तोडगा निघणार की जरांगे पाटील आरक्षणावर ठाम राहणार.
राज्य शिष्टमंडळाच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
मनोज जरांगे यांच्यासोबत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार. सकारामत्क चर्चा झाल्यानं मराठा आरक्षणावर तोडगा निघण्याची शक्यात आहे. जरांगे पाटील मुंबईत दाखल होण्याआधी राज्यपाल रमेश बैस यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी भाषणात मराठा आरक्षणावर भूमिका मांडली आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्याच्या मोठ्या हालचाली सुरु झाल्या असल्याचं दिसत आहे. मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत काय घडलं यांची माहिती देण्याची शक्यता. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन थांबण्याची देखील मोठी शक्यता आहे.