सरकारनं विरोधकांना विश्वासात घ्यावं असं अजित पवार का म्हणाले? काय आहे कारण?
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. त्याचबरोबर या प्रकणात विरोधकांसह विधीमंडळातील तज्ज्ञ लोकांना किंवा या संदर्भातील गाढा अभ्यास असणाऱ्या लोकांना सहभागी करून घ्यावं
मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वोच्च न्ययालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह मराठा समाजाला हा धक्का मानला जात आहे. यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. त्याचबरोबर या प्रकणात विरोधकांसह विधीमंडळातील तज्ज्ञ लोकांना किंवा या संदर्भातील गाढा अभ्यास असणाऱ्या लोकांना सहभागी करून घ्यावं. तसेच याबाबत काय केलं पाहिजे यासाठी तातडीने सरकारने निर्णय घेतला पाहिजे असेही स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
Published on: Apr 21, 2023 12:55 PM
Latest Videos