Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू- मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन
मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने विशाल रैली देखील काढली होती. मात्र समाधानकारक तोडगा न निघाल्याने मराठा समाज अजूनही नाराज असल्याचे चित्र आहे.
Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू तसेच आरक्षणासंबंधित लवकरच बैठक घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दिले आहे. जालना जिल्ह्यातील भंभेरी गावात मराठा समाजाचे उपोषण सुरु आहे. या संदर्भात मराठा नेते नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मागण्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने विशाल रैली देखील काढली होती. मात्र समाधानकारक तोडगा न निघाल्याने मराठा समाज अजूनही नाराज असल्याचे चित्र आहे. शिंदे सरकारच्या काळात या मागण्या पूर्ण होतात का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Aug 11, 2022 09:02 AM
Latest Videos