'मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र नको', नारायण राणे यांचा दावा, जरांगे पाटील यांची भूमिका काय?

‘मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र नको’, नारायण राणे यांचा दावा, जरांगे पाटील यांची भूमिका काय?

| Updated on: Oct 19, 2023 | 5:49 PM

राज्य सरकारला कुठल्याही जाती किंवा कुठल्याही वर्गाला आरक्षण द्यायचं असेल तर घटनेचं कलम काय म्हणत ते पहा. मी त्याचा भरपूर अभ्यास केलाय म्हणूनच बोलतोय. शहाण्णव कुळे मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे.

मुंबई | 19 ऑक्टोंबर 2023 : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. मला त्या वादात जायचं नाही. मी एवढंच म्हणेन की मराठा आणि कुणबी यात फरक आहे. जरांगे पाटील म्हणतात की ते एकच आहेत. पण, ते एकच नाही. त्यांनी जातीचा अभ्यास करावा. घटनेचा करावा, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलंय. शहाण्णव कुळे मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे. त्यांना सरसकट प्रमाणपत्र द्यावं अशी त्यांची मागणी आहे. पण, सरसकट नको. कोणत्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजे? कुठल्या मराठ्यांना पाहिजे सरसकट आरक्षण? कोणता मराठा हा कुणबी दाखला घेईल. कुणी घेणार नाही. मी कधीच आयुष्यभर कधीच कुणबी मराठा प्रमाणपत्र घेणार नाही, असेही नारायण राणे म्हणाले.

Published on: Oct 19, 2023 05:49 PM