सिग्नल शाळेतील मुलांसोबत मराठी कलावंतांची होळी
करूणा, दारिद्रय, दैन्य, व्यसनाधिनता सारख्या रंगांनी ज्यांचे आयुष्य काळवंडलेले अशा सिग्नल शाळेच्या मुलांसोबत मराठी चित्रपट (marathi Actors) सृष्टींतील कलावंत, दिग्दर्शकांनी होळी (Holi) साजरी करत त्यांच्या आयुष्यात रंग भरले
मुंबई : करूणा, दारिद्रय, दैन्य, व्यसनाधिनता सारख्या रंगांनी ज्यांचे आयुष्य काळवंडलेले अशा सिग्नल शाळेच्या मुलांसोबत मराठी चित्रपट (marathi Actors) सृष्टींतील कलावंत, दिग्दर्शकांनी होळी (Holi) साजरी करत त्यांच्या आयुष्यात रंग भरले. ठाण्याच्या तीन हात नाका येथे भीक्षेकरी मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या शाळेत आज अनोखी अशी रंगपंचमी (Holi) साजरी केली गेली सोबतच वाईट गुणांची होळी देखील शाळेच्या मुलांनी केली. समर्थ भारत व्यासपीठ व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विदयमाने ठाण्याच्या तीन हात नाका पुलाखाली सिग्नल शाळा नावाची शाळा गेली सात वर्षे भरवली जाते. पुलाखाली एकेकाळी भीक मागत असलेली ५२ मुले या शाळेमुळे शिकती झाली्.
Published on: Mar 18, 2022 01:45 PM
Latest Videos