मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास शाळेत शिकवा; राज ठाकरे यांची मागणी
खरं तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, हा एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे.
मुंबई: आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन (marathwada muktisangram) आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी मोठी मागणी केली आहे. आता नवं शिक्षण धोरण येत आहे. या धोरणानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकलेला इतिहास शाळेत शिकवला जाणार आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकात शिकवला गेला पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. तसेच, हैद्राबादच्या (hyderabad) निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे. म्हणून खरं तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, हा एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे.
Published on: Sep 17, 2022 11:04 AM
Latest Videos