Drought In Marathwada : मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
Jayakwadi Dam Water Level Drop : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मराठवाड्यात पाण्याची टंचाई निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा मारठवाड्याला लवकरच पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मराठवाड्यात पाण्याची टंचाई निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या संपूर्ण मराठवाड्यात उन्हाचा तडाखा वाढलेला बघायला मिळत आहे. मारठवड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात केवळ 58 टक्के पाणीसाठा शिल्लक राहील असल्याची माहिती समोर आली आहे. बाष्पीभवनामुळे धरणाच्या पाणी साठयात घट झाली असल्याचं धरण प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मराठवाड्याच्या प्रमुख 44 छोटे मोठे धरण मिळून केवळ 55 टक्के पाणी साठा उरलेला आहे. तर पाझर तलाव हे आत्ताच पूर्णपणे आटलेले बघायला मिळत आहे. त्यामुळे कडक्याच्या उन्हाळ्याचे 2 महीने कसे जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आत्तापासूनच टँकरने पाणी पुरवठा होत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हर्सुल धरणातला पाणी साठा हा निम्म्याहून कमी झाला आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा मारठवाड्याला लवकरच पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल

कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...

राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत

'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं
