औरंगाबादमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, काय आहे या दिवसाचे महत्त्व?
स्वतंत्र भारतात विलीन होण्यासाठी मराठवाड्याला निजामांशी संघर्ष करावा लागला होता. 1938 ते 1048 या काळात मराठवाड्याच्या लोकांनी निजामांशी लढा दिला. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस बळाचा वापर करून निजामांना परतवून लावले,
औरंगाबादमध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त्त आयोजित करण्यात आलेल्या शासकीय कार्यक्रमात मुंख्यामंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री भगवत कराड आणि रावसाहेब दानवे हजर होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते द्वाजारोहण करण्यात आले. त्यानंतर हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांनी हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्प चक्र अर्पण केले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर तीन संस्था या स्वतंत्र भारतात सामील झालेल्या नव्हत्या त्यापैकी मराठवाडा हा औरंगाबाद संस्थानाच्या हद्दीत होता. स्वतंत्र भारतात विलीन होण्यासाठी मराठवाड्याला निजामांशी संघर्ष करावा लागला होता. 1938 ते 1048 या काळात मराठवाड्याच्या लोकांनी निजामांशी लढा दिला. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस बळाचा वापर करून निजामांना परतवून लावले, आणि मराठवाड्याला निजामांच्या जाचातून मुक्त केले. हा दिवस होता 17 सप्टेंबर त्यामुळे या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात येतो.