शेतमालाला भाव कधी? कांदा-कापूस-सोयाबीनसाठी विधानभवनावर मोर्चा पण…, मोर्चेकऱ्यांचे आरोप काय?
कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही, या पिकाला योग्य भाव द्या, या मागणीसह इतर काही मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चा. हा मोर्चा नागपूर विधानभवनावर निघाला असता तो विधानभवनावर पोहोचण्याआधीच रोखला
मुंबई, २० डिसेंबर २०२३ : कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही, या पिकाला योग्य भाव द्या, या मागणीसह इतर काही मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा नागपूर विधानभवनावर निघाला असता तो विधानभवनावर पोहोचण्याआधीच रोखला गेला. यावेळी सरकारविरोधात रविकांत तुपकर यांनी आरोप करत त्यांचा निषेध केला. १५ दिवसांपूर्वी सरकारने आश्वासन दिलं होतं. मात्र ते न पाळल्याने विधानभवनावर मोर्चा धडकणार होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी हा मोर्चा अडवला. तर दुसरीकडे कांदा निर्यात बंदीचा निर्णय कायम आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी दिल्लीतून याबद्दल सकारात्मक निर्णयाचं आश्वासन दिलं मात्र ९ दिवस झाले तरी अजित पवार याची दिल्लीवारी झाली नाही. बघा काय म्हणाले अजित पवार?
Published on: Dec 20, 2023 11:40 AM