साताऱ्यातील राड्यानंतर खा.उदयनराजे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात...

साताऱ्यातील राड्यानंतर खा.उदयनराजे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात…

| Updated on: Jun 21, 2023 | 3:50 PM

आ.शिवेंद्रराजे भोसले यांचा यांच्या हातून होणार भूमिपूजन कार्यक्रम खा.उदयनराजे भोसले यांच्या समोरच कार्यकर्त्यांनी उधळून लावला. मात्र याच्या आधीच उदयनराजे यांच्या समोरच शिवेंद्रराजे यांनी त्यांचा विरोध झुगारत भूमिपूजन केलं.

सातारा : साताऱ्यातील खिंडवाडी येथील बाजार समितीच्या भूमिपूजन कार्यक्रमात आज जोरदार राडा झाला. येथे आ.शिवेंद्रराजे भोसले यांचा यांच्या हातून होणार भूमिपूजन कार्यक्रम खा.उदयनराजे भोसले यांच्या समोरच कार्यकर्त्यांनी उधळून लावला. मात्र याच्या आधीच उदयनराजे यांच्या समोरच शिवेंद्रराजे यांनी त्यांचा विरोध झुगारत भूमिपूजन केलं. त्यावरून भडकलेल्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम स्थळी असणाऱ्या वस्तूंचे नुकसान केलं. त्याचबरोबर तयार करण्यात आलेलं कॅबिनदेखील जेसीबीने तोडून टाकण्यात आलं. याराड्यानंतर आता उदयनराजेंनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी, ही जागा माझ्या मालकीची आहे. तर येथे काही कूळ आहेत. मात्र मागिल काही वर्षांपासून ते इथे नव्हते. ते आर्मीमध्ये होते. आता येथे कोणीही येऊन दगड ठेवणार, नारळ फोडणार, फटाके फोडणार? ते ही न्यायालयाची स्थगिती असताना? आणि याला पोलिस मदत करतात. त्यामुळे आता यावरचा सविस्तर ड्राफ्ट तयार केला जाईल. जो उपमुख्यमंत्री यांच्यासमोर ठेऊन यावर चर्चा होईल. ते तेथे येणार आहेत अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली आहे.

Published on: Jun 21, 2023 03:50 PM