जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोष देशमुख यांच्या बंधूंची खंत

जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोष देशमुख यांच्या बंधूंची खंत

| Updated on: Dec 29, 2024 | 1:13 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी काल बीड कलेक्टर कार्यालयावर सर्व पक्षीय मोर्चा निघाला होता. या प्रकरणात आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यावर संतोषचे बंधू मीडियाशी बोलले आहेत.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर काल बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.या मोर्चात अनेक नेत्यांनी आपली भूमिका मांडली आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या प्रकरणात आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री दिले आहेत. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रीया दिली आहे. प्रॉपर्टी जप्त करुन काय होणार आहे. आमचा माणूस तर तुम्ही परत आणून देणार नाही. त्यामुळे आमची मागणी आहे आरोपींना फाशीची शिक्षा करा अशी आहे. ही संघटीत गुन्हेगारीच आहे. ज्या माणसाकडे राहायला धड घर नाही त्याच्याकडे स्कॉर्पिओ गाडी येते कशी ? असा सवाल करीत या संघटीत गुन्हेगारीकडे दुर्लक्ष नको. पकंजाताईंनी वहिनीला व्हिडीओ कॉल केला होता. न्याय मिळाला पाहीजे अशा त्या बोलल्या होत्या. विधीमंडळात सर्वजण एक झाले. परंतू जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती अशी खंतही धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

 

Published on: Dec 29, 2024 01:06 PM