मुलुंड टोल नाक्यावर चक्काजाम, ठाणे ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहनांची लांबच लांब रांग

मुलुंड टोल नाक्यावर चक्काजाम, ठाणे ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहनांची लांबच लांब रांग

| Updated on: Aug 03, 2023 | 11:23 AM

रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे त्याचा नाहक त्रास चाकरमान्यांना सहन करावं लागत आहे. तर दुसरीकडे वाहतूक कोंडीने देखील मुंबईकर चांगलेच त्रासले आहेत.

मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसापासून सुरू असणाऱ्या सततच्या पावसामुळे मुंबईत अनेक रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे त्याचा नाहक त्रास चाकरमान्यांना सहन करावं लागत आहे. तर दुसरीकडे वाहतूक कोंडीने देखील मुंबईकर चांगलेच त्रासले आहेत. आज देखील ठाणे ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मुलुंड टोल नाका येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. येथे वाहतूक कोंडीमुळे दोन ते तीन किलोमीटर वाहणांच्या रांगा लागल्या होत्या. ज्यामध्ये रुग्णवाहिका दुचाकी, चारचाकी अडकल्या होत्या. टोलनाक्याची वसुली, सतत पडणाऱ्या पाऊस, अर्धवट कामामुळे आणि रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आठवड्यातील चौथा दिवस असून चाकरमान्याना कामावरती जाण्यासाठी देखील उशीर होताना दिसत आहे. तर याकडे वाहतूक विभाग कशाप्रकारे लक्ष देत हे पाहणं आता महत्वाचं ठरणार असून प्रशासनाने वाहतूक कोंडी सोडवण्यावर लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा चाकरमान्यांची आहे.

Published on: Aug 03, 2023 11:23 AM