मविआ सरकारने स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा घातलेला वाद हा निष्कारण : आशिष शेलार – tv9
भारतरत्न वाजपेयींच्या पूर्णाकृती पुतळ्याला मोरून विरोध करता येत नाही म्हणून मविआने अडून लपून विरोध केल्याचं म्हटलं आहे.
मुंबई : स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा यापूर्वीच्या काळात आणि पूर्वीच्या सरकारने घातलेला वाद हा निष्कारण असल्याची टीका मुंबई भाजपध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच त्यांनी सगळ्या परवानग्या आल्यानंतर आज इथे वाजपेयींचा अनावरण होतं असल्याचा आनंद असल्याचे तसेच समाधानी असल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर शेलार यांनी सगळ्या कागदपत्रांची परिपूर्णता झाल्यानंतरही आडकाठी केली गेली. भारतरत्न वाजपेयींच्या पूर्णाकृती पुतळ्याला मोरून विरोध करता येत नाही म्हणून मविआने अडून लपून विरोध केल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर शेलार यांनी बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांची मैत्री पाहता उद्धव ठाकरेंनी नक्की चिंतन करावं असं ही म्हटलं आहे.
Published on: Aug 16, 2022 12:01 PM
Latest Videos