...तर संजय राऊत यांची जीभ छाटून टाकू, शिवसेनेची 'ही' महिला नेता आक्रमक, म्हणाली...

“…तर संजय राऊत यांची जीभ छाटून टाकू”, शिवसेनेची ‘ही’ महिला नेता आक्रमक, म्हणाली…

| Updated on: Jun 04, 2023 | 8:13 AM

शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत थुंकल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून शनिवारी त्यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

ठाणे: शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत थुंकल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून शनिवारी त्यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “संजय राऊत यांच्या कृतीवर आक्रमक होऊन आज महिला आघाडी आणि युवासेना रस्त्यावर उतरली आहे. अशा प्रकारचं कृत्य खासदार म्हणून संजय राऊत यांनी शोभत नाही, राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. संजय राऊत हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांची जीभ आम्ही छाटून टाकी. त्यांनी गद्दारीवर बोलू नये कारण ते स्वत: गद्दार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत”, असं मीनाक्षी शिंदे म्हणाल्या.

 

Published on: Jun 04, 2023 08:13 AM