जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल गठीत करण्यासंदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात सर्वपक्षीय नेत्यांची आज (सोमवारी) दुपारी बैठक होणार आहे. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse), भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), तसेच शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे तीन पक्षांचे तीन दिग्गज नेते यावेळी समोरासमोर येण्याची शक्यता आहेत.