मुंबईकरांनो प्रवासाचा बेत आखताय? घराबाहेर पडताय? तर पाहा आज कुठे आहे मेगा ब्लॉक?
पण खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यासाठी रविवारी ही कामावर जावं लागत तर अनेकांना हा दिवस सुट्टीचा असल्याने मुंबई बाहेर निघण्याचा बेत असतो. पण यावेळी घराबाहेर पडण्याआधी जरा थांबा. तर रेल्वेच वेळापत्रक पाहूनच प्रवासासाठी घराबाहेर पडा.
मुंबई, 13 ऑगस्ट 2023 | आज रविवार असून मंगळवारी १५ ऑगस्ट आहे. सरकारी विभागात काम करणाऱ्यांनी तर शुक्रवारीच मुंबई सोडली आहे. लागून शनिवार, रविवार, सोमवार ऑफिसला रजा आणि मंगळवारी झेंडावंदन तर बुधवारी पारशी दिनानिमीत्त सुट्टी असल्याने अनेकांनी काहीना काही बेत आखला असेल. पण खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यासाठी रविवारी ही कामावर जावं लागत तर अनेकांना हा दिवस सुट्टीचा असल्याने मुंबई बाहेर निघण्याचा बेत असतो. पण यावेळी घराबाहेर पडण्याआधी जरा थांबा. तर रेल्वेच वेळापत्रक पाहूनच प्रवासासाठी घराबाहेर पडा. आज मुंबईच्या दोन्ही महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर देखभाल दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंडच्या मध्ये अप-डाऊन जलद मार्गावर 11 ते 4 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर मानखुर्द आणि नेरुळ च्या मध्ये अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ आणि गोरेगावच्या दरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे आज प्रवास करताना मुंबईकरांनी वेळापत्रक बघून बाहेर पडा असं आवाहन सुद्धा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तर ट्रान्स हार्बर मार्गावर रात्री 11.50 ते रविवार पहाटे 04.50 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर रात्री पादचारी पुलासाठी गर्डर्स बसवण्यात येणार असून सेंट्रल रेल्वे ते ट्रान्स हार्बर रेल्वे वर पादचारी पूल बांधण्यात येणार आहे.