मेन लाईन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक? मात्र सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान का धावणार लोकल?
प्रत्येक रविवार प्रमाणे याही रविवारी सेंट्रल आणि हार्बर लाईनवर मुंबई लोकल मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान येथे देखभाल-दुरुस्तीसाठी मार्गावर ब्लॉक असणार आहे.
मुंबई : 20 ऑगस्ट 2023 | रविवारी म्हटलं की सुट्टीचा दिवस. अनेक मुंबईकर हे मुंबई बाहेर पडत असतात. एखादा दिवस हा विकेंडचा असल्याने चाकरमाने ही बाहेर पडतात. पण अजून घराबाहेर पडला नसाल तर थांबा. ही बातमी वाचूनच बाहेर पडा. २० ऑगस्ट रोजी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तर मेन लाईन आणि हार्बर मार्गावर ब्लॉक असणार आहे. माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. याकाळात जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. परिणामी लोकल गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने धावणार धावतील. तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान अप व डाउन दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत दुरुस्ती करण्यात येणार आहे. या दरम्यान कुर्ला ते वाशी दरम्यानची लोकल सेवा पुर्णपणे बंद राहणार आहे. तर प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यत ट्रान्स हार्बर मार्गावरुन प्रवासाची परवानगी दिली आहे.