Raigad Rain Red Alert : रायगड जिल्हात आज धुवांधार; शाळांना सुट्टी, प्रशासन रेड अलर्ट मोडवर
राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला असून कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात नद्या उफाळून वाहत आहेत. तर चिपळूनमध्ये पूर स्थिती निर्माण झाली होती.
रायगड, 27 जुलै 2023 | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे. राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला असून कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात नद्या उफाळून वाहत आहेत. तर चिपळूनमध्ये पूर स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आज रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर हवामान विभगाने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालयांना काल बुधवारी (26 जुलै) सुट्टी देण्यात आली होती. पण आज रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज देखील सुट्टी देण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी राहावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केलं गेलं आहे. Raigad Rain Red Alert