Monsoon Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; पुढील तीन दिवस पावसाची शक्यता

Monsoon Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; पुढील तीन दिवस पावसाची शक्यता

| Updated on: Jul 24, 2022 | 10:01 AM

Monsoon Update गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारी बातमी समोर येत आहे. राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून, पुढील दोन ते तीन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आधीच पावसाचा मोठा फटका बळीराजाला बसला आहे आणि आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.