अवकाळी-गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला, मोठं नुकसान
शुक्रवारी नंदुरबार शहरासह ठाणेपाडा परिसरात जोरदार गारपीट झाली. ठाणेपाडा परिसरात ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाटासह पाऊस पडला
नंदुरबार : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. तर नंदुरबार जिल्ह्यातही १७ मार्च रोजी वादळासह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. सगल चार वेळा पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शुक्रवारी नंदुरबार शहरासह ठाणेपाडा परिसरात जोरदार गारपीट झाली. ठाणेपाडा परिसरात ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाटासह पाऊस पडला. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. यंदाच्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. तर अवकाळी पावसाने गहू,मक्का, हरभरा, तूर, कपास आधी पिकांचे नुकसान झाले आहे.
Latest Videos