Aabasaheb Patil : मेटेंच्या अपघाताची चौकशी करावी, आबासाहेब पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अपघात होऊन दोन तास उलटले तरी रुग्णवाहिका कशी पोहचली नाही. शिवाय उपचारासाठी वेळ का लागला आशा शंका सर्वसामान्यांच्या मनात आहेत. त्यामुळे यासंबंधी चौकशीचे आदेश आताच दिले तर योग्य दिशेने तपास सुरु राहिल अशी मागणी मराठा समाजाचे आबासाहेब पाटील यांनी केली आहे. शिवाय मेटे यांनी आयुष्यभर केवळ समाजाचा प्रश्न मार्गी लागावेत यासाठी प्रय़त्न केले आहेत. त्यामुळे आरक्षण दिल्यानंतरच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे पाटील म्हणाले आहेत.
मुंबई : विनायक मेटे यांचे मराठा समाजासाठी मोठे योगदान होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर सातत्याने तारिख-पे-तारिख यामुले सर्वच व्यथित असायचो पण मेटे यांचे योगदान न विसरण्यासारखे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी आता तरी आरक्षणाबाबतचा निर्णय घ्यावा, अन्यथा आता समाज स्वस्त बसणार नाही. शिवाय मेटे यांच्य अपघाताबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. अपघात होऊन दोन तास उलटले तरी रुग्णवाहिका कशी पोहचली नाही. शिवाय उपचारासाठी वेळ का लागला आशा शंका सर्वसामान्यांच्या मनात आहेत. त्यामुळे यासंबंधी चौकशीचे आदेश आताच दिले तर योग्य दिशेने तपास सुरु राहिल अशी मागणी मराठा समाजाचे आबासाहेब पाटील यांनी केली आहे. शिवाय मेटे यांनी आयुष्यभर केवळ समाजाचा प्रश्न मार्गी लागावेत यासाठी प्रय़त्न केले आहेत. त्यामुळे आरक्षण दिल्यानंतरच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे पाटील म्हणाले आहेत.