Pankaja Munde : मेटेंची भेट अधुरी राहिली, 15 ऑगस्टनंतर भेटण्याचे ठरले होते
ऊसतोड कामगार महामंडळ हे गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने व्हावे अशी इच्छा देखील त्यांनीच सर्वप्रथम व्यक्त केली होती. दोन आठवड्यापूर्वी त्यांचा फोन आला होता आणि त्यांनी खूप काही बोलायचे असल्याची इच्छा व्यक्त केली होती पण इच्छा अधुरी राहिल्याची खंत कायम मनात असेल असेही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.
बीड : शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले आहेत. यावेळी राजकीय नेत्यांनीही उपस्थिती दर्शवली होती. आपल्या भावना व्यक्त करताना पंकजा मुंडे यांनी सांगितले की, या अमृत महोत्सवानंतर आमचे भेटण्याचे ठरले होते. मात्र, नियतीने हे होऊ दिले नाही. अशा पद्धतीने मेटे साहेब हे जगाचा निरोप घेतील असे कुणालाच वाटले नाही. त्यांनी संपू्र्ण आयुष्य हे मराठा समाजासाठी आणि आरक्षणासाठी खर्ची केले. अखेरच्या टप्प्यातही ते आरक्षणाच्या बैठकीच्या अनुशंगानेच मुंबईकडे रवाना होत असताना ही घटना घडली आहे. ऊसतोड कामगार महामंडळ हे गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने व्हावे अशी इच्छा देखील त्यांनीच सर्वप्रथम व्यक्त केली होती. दोन आठवड्यापूर्वी त्यांचा फोन आला होता आणि त्यांनी खूप काही बोलायचे असल्याची इच्छा व्यक्त केली होती पण इच्छा अधुरी राहिल्याची खंत कायम मनात असेल असेही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.