Metro trial Run: मेट्रो 3 च्या ट्रायल रनसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल

| Updated on: Aug 30, 2022 | 11:50 AM

मेट्रो 3 च्या ट्रायल रनला थोड्याच वेळात सुरवात होईल. 2023 पर्यंत या मेट्रोचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. कुलाबा ते खार अशी ट्रायल होणार आहे. तूर्तास यामध्ये प्रवाश्यांना प्रवास करण्याची परवानगी नाही, कारण याची सेफ्टी चाचणी अद्याप बाकी आहे.

बहुप्रतीक्षित मेट्रोच्या तिसऱ्या फेजचे आज ट्रायल रन होणार आहे. हे ट्रायल रन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या निवास्थानावरून रवाना झालेले आहेत. मुंबई मेट्रो प्रकल्पावरून वाद निर्माण झाला होता. हा मेट्रो प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहे. मेट्रो 3 च्या ट्रायल रनला थोड्याच वेळात सुरवात होईल. 2023 पर्यंत या मेट्रोचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. कुलाबा ते खार अशी ट्रायल होणार आहे. तूर्तास यामध्ये प्रवाश्यांना प्रवास करण्याची परवानगी नाही, कारण याची सेफ्टी चाचणी अद्याप बाकी आहे.

 

Published on: Aug 30, 2022 11:50 AM