MHADA : दिवाळीत 4 हजार घरांची सोडत, मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण
मुंबई मंडळाने सोडतीची तयारी सुरू केली आहे. लवकरच घोषणेची शक्यताय. तीन वर्षांपासून म्हाडाच्या घरांच्या सोडतीची मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार आहे. यामुळे आता लवकरच होऊ शकतं तुमच्या हक्काचं घर…
मुंबई : मागील तीन वर्षांपासून म्हाडाच्या (Maharashtra Housing and Area Development Authority) घरांच्या सोडतीची मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. दिवाळीमध्ये मुंबईमध्ये सुमारे 4 हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे. आपलं हक्काचं, स्वत:चं घर असावं, असं प्रत्येकाला वाटतं. मुंबईसारख्या मोठ्या शहरात, या मेट्रो सिटीमध्ये नोकरीनिमित्त अनेक लोक येतात. त्यांना आपल्या बजेटमध्ये दर्जेदार घर घेण्यासाठी म्हाडाची (MHADA) योजना आहे. छोटं का होईना पण आपलं हक्काचं घर (House) मुंबईत असावं असं प्रत्येकाला वाटतं. हीच घर घेण्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. या निर्णयामुळे अनेकांचं स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. मुंबई मंडळाने सोडतीची तयारी सुरू केली असून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. तीन वर्षांपासून म्हाडाच्या घरांच्या सोडतीची मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार आहे. यामुळे आता लवकरच होऊ शकतं तुमच्या हक्काचं घर…