‘थंड हवेच्या ठिकाणाहून महिन्यानंतर येऊन शिवसैनिकांना शहाणपणा शिकवू नये’; ठाकरे यांच्यावर कोणाची टीका?

‘थंड हवेच्या ठिकाणाहून महिन्यानंतर येऊन शिवसैनिकांना शहाणपणा शिकवू नये’; ठाकरे यांच्यावर कोणाची टीका?

| Updated on: Jun 19, 2023 | 2:34 PM

शिवसेना कार्यकर्ता शिबीरातून भाजपसह शिंदे गटावर हल्ला चढवला होता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावरून आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी हल्लाबोल केला आहे.

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे थंड हवेच्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर येताच त्यांनी काल शिवसेना कार्यकर्ता शिबीरातून भाजपसह शिंदे गटावर हल्ला चढवला होता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावरून आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी हल्लाबोल केला आहे. त्यांनी, ठाकरे यांचा शिवसेना पक्ष नाही तो गट आहे. तर गटात फक्त चर्चा होत असते, वाईट बोलणं, टीका करणं फाईलींवर कंत्राटदाराच्या भाषेत बोलण्याच्या पलीकडे काहीच होत नाही. तर या सर्व गोष्टींना आता महाराष्ट्राची जनता कंटाळलेली आहे. राज्यातील जनता ही विकासाचं राजकारण करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मागे उभी आहे. तर बाकीच्यांनी थंड हवेच्या ठिकाणाहून एक महिन्यांनी येऊन शिवसैनिकांना शहाणपणा शिकवू नये अशी खोचक टीका म्हात्रे यांनी केली आहे. तर रात्रंदिवस काम करणारी आणि थंड हवेच्या ठिकाणी जाऊन आराम व्यक्ती कोण? येथे येऊन शहाणपणा शिकवणारी व्यक्ती कोण हे शिवसैनिकांना चांगलं माहित असल्याचा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला आहे.

Published on: Jun 19, 2023 02:34 PM