लडाख येथील स्थलांतरित जोडप्याचे भंडारा येथे मुक्काम
या वर्षी पाऊस चांगल्या प्रमाणत पडल्याने तलाव ,बोड्या पाण्याने भरलेल्या आहेत. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्याचे आगमन परिसरात होत आहे.
मुंबई : या वर्षी पाऊस (Rain) चांगल्या प्रमाणत पडल्याने तलाव ,बोड्या पाण्याने भरलेल्या आहेत. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्याचे आगमन परिसरात होत आहे. मागील काही दिवसांपासून चक्रवाक पक्ष्याचे जोडपे तलावात मुक्त संचार करताना दिसत आहे. याला भगवा किंवा बदामी रंगाचा सोनेरी पिसारा, केतकी रंगाचे डोके आणि मान व काळी शेपटी अशा रंगसंगतीने सुंदर दिसणारे हे स्थलांतरित पाहुण्या बदकांनी परिसरातील तलाव व बोड्यान मध्ये हजेरी लावली आहे. इंग्रजीत रुडी शेल्डक (Rudy Shelduck) किंवा ब्राह्मणी डक (Brahmany duck) असे नाव असलेल्या या स्थलांतरित बदकांना मराठीत चक्रवाक, ब्राह्मणी बदक, चकवा, चकवी, सोनेरी बदक इत्यादी नावाने ओळखला जातो. आकाराने मोठ्या बदकाएवढ्या असलेल्या या बदकांना निसर्गाने मनमोहक रंग बहाल केल्यामुळे ही बदके रुबाबदार वाटतात. हे बदक जोडीने येऊन पाणवनस्पतीची कोवळी पाने, कोंब, खोड व गोगलगायी, शिंपल्यातील मृदुकाय प्राणी खाण्यात व्यस्त आहेत. जलकीटक, मासे, बेडकांची पिल्ले यासह चिखलातील कृमी, कीटक सुद्धा ह्या बदकांचे प्रमुख खाद्य आहे.
Published on: Feb 15, 2022 10:50 AM
Latest Videos