क्षणाक्षणाला वाढतेय एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेनेमधली दरी; नाराज शिंदेंना भेटायला नार्वेकर सुरतमध्ये दाखल

| Updated on: Jun 21, 2022 | 5:26 PM

शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मिलिंद नार्वेकर सुरत येथील ली मेरिडियन हॉटेल येथे पोहोचले आहेत. नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून बंडामागचे नेमके कारण जाणून घेण्याचा प्रयत्त्न करणार आहेत. शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे ही दरी क्षणाक्षणाला वाढत चाललेली आहे. आज संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे राजीनामा देऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान […]

शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मिलिंद नार्वेकर सुरत येथील ली मेरिडियन हॉटेल येथे पोहोचले आहेत. नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून बंडामागचे नेमके कारण जाणून घेण्याचा प्रयत्त्न करणार आहेत. शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे ही दरी क्षणाक्षणाला वाढत चाललेली आहे. आज संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे राजीनामा देऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या व्दिटमुळे शिवसेनेमधली अंतर्गत खदखद बाहेर आलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. एकनाथ शिंदे थांबलेल्या हॉटेलच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे. हॉटेलमध्ये कोणालाच आत जाण्याची परवानगी नाही.

Published on: Jun 21, 2022 05:26 PM