राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर माहिममध्ये कारवाई; एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आक्रमक, म्हणाले…
imtiaz jaleel : राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडव्याच्या सभेत माहिमच्या दर्गाहचा विषय मांडला. त्यानंतर आज कारवाई करण्यात आली आहे. यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडव्याच्या सभेत माहिमच्या दर्गाहचा विषय मांडला. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर आज कारवाई करण्यात आली आहे. माहिममधील अतिक्रमण हटवण्याला सुरुवात आलं. खाडीतील मजारच्या जागेवरचा हिरवा झेंडा हटवण्यात आला आहे. तसंच अनधिकृत मजारवर बुलडोझर फिरवण्यात आलाय. या कारवाईवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माहिममधील बांधकाम अनधिकृत असेल तर कारवाई व्हायलाच पाहिजे. पण ही कारवाई सगळीकडेच व्हायला पाहिजे. याला धर्माची किनार नको. सगळीकडचंच अतिक्रमण हटवलं गेलं पाहिजे”, असं जलील म्हणाले आहेत.
Published on: Mar 23, 2023 12:43 PM
Latest Videos