‘समृध्दी महामार्गावर भीषण अपघात नाही, तर प्रवाशांची हत्या’, शिंदे-फडणवीस यांच्यावर कोणी केली टीका?

‘समृध्दी महामार्गावर भीषण अपघात नाही, तर प्रवाशांची हत्या’, शिंदे-फडणवीस यांच्यावर कोणी केली टीका?

| Updated on: Jul 01, 2023 | 2:14 PM

सिंदखेडराजा परिसरात पिंपळखुटा येथे झाला. त्यात बसला आग लागून 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाना साधला आहे. याचदरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या अपघाताचे खापर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडले आहे.

छत्रपती संभाजीनगर : बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी बसचा भीषण अपघात झाला. हा सिंदखेडराजा परिसरात पिंपळखुटा येथे झाला. त्यात बसला आग लागून 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाना साधला आहे. याचदरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या अपघाताचे खापर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडले आहे. तसेच हा अपघात नसून प्रवाशांची हत्या असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना जलील यांनी, शिंदे-फडणवीस यांना फक्त स्वार्थासाठी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करायचं होतं. त्यासाठी त्यांनी काही महिन्याआधी मीडिया इव्हेंट केला. पण त्यानंतर आता पर्यंत दररोज येथे अपघात होत आहेत. तर आज तब्बल 25 जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. हा अपघात नाही तर प्रवाशांची हत्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली. तर याला जबाबदार असणारेच आता तेथे पाहणी दौरा करत आहेत. तेही 5 लाख वाटपाची घोषणा करण्यासाठी. येथेही मीडिया इव्हेंट करण्यासाठी. त्यांच्या सरकारमध्ये माणसाची किंमत ही 5 लाख झालीय आणि हिच घोषणा करण्यासाठी ते येतायत अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

Published on: Jul 01, 2023 02:14 PM