मुख्यमंत्री होऊनही शिवसैनिकांना न्याय देता आला नाही; अब्दुल सत्तार यांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुख्यमंत्री होऊनही शिवसैनिकांना न्याय देता आला नाही; अब्दुल सत्तार यांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा

| Updated on: Oct 21, 2022 | 2:21 PM

कृषी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचा आता धाक राहिला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे,

मुंबई : कृषी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचा आता धाक राहिला नाही. ठाकरे यांचा धाक राहिला असता तर 40- 50 आमदारांनी पक्ष सोडला असता का? लाखो कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडले असते का? असा सवाल अब्दुल सत्तार यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊन साधा शिवसैनिकांना देखील न्याय देता आला नसल्याचंही सत्तार यांनी म्हटलं आहे. अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता अब्दुल सत्तार यांच्या या टीकेला ठाकरे गट काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

 

Published on: Oct 21, 2022 02:21 PM