Special Report | बंडखोरांना विधानसभेटी पायरी चढू देणार नाही

Special Report | बंडखोरांना विधानसभेटी पायरी चढू देणार नाही

| Updated on: Jun 28, 2022 | 10:08 PM

दीपक केसरकर यांनी आम्ही पण अशा टीका केल्या तर चालतील का म्हणत संजय राऊत यांना आम्ही मतदान केले आहे, त्यांनी त्यांची भाषा वापरताना योग्य वापरावी आणि नैतिकता असेल तर राज्यसभेचा राजीनामा द्यावा असंही त्यांना सुनावण्यात आले.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या तोफा एकापेक्षा एक धडधडू लागल्या. आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर टीका करताना घाण गेली म्हणत पुन्हा निवडणुका लावा यांना पाडल्याशिवाय राहणार नाही असं थेट आवाहन शिंदे गटातील आमदारांना केले. तर बंडखोर आमदारांना पुन्हा निवडणुका लागल्या तर विधान सभेची पायरी पुन्हा चढू देणार नाही असं ठाणपणे सांगितले. शिवसेनेकडून अशा टीका करण्यात येत असल्या तरी, दीपक केसरकर यांनी आम्ही पण अशा टीका केल्या तर चालतील का म्हणत संजय राऊत यांना आम्ही मतदान केले आहे, त्यांनी त्यांची भाषा वापरताना योग्य वापरावी आणि नैतिकता असेल तर राज्यसभेचा राजीनामा द्यावा असंही त्यांना सुनावण्यात आले.

Published on: Jun 28, 2022 10:08 PM