दीपक केसरकर यांच्या त्या दाव्यावर भुजबळ यांचा टोला; म्हणाले, ‘मग नाशिकमधली धरणं फुल्ल करा...’

दीपक केसरकर यांच्या त्या दाव्यावर भुजबळ यांचा टोला; म्हणाले, ‘मग नाशिकमधली धरणं फुल्ल करा…’

| Updated on: Jul 30, 2023 | 2:29 PM

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीला तर पूर आल्याने अनेक ठिकाणी रस्ते बद झाले होते. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे आठवड्यात धरणाचे दोनवेळा स्वयंचलित दरवाजे उघडले होते. ज्यामुळे पंचगंगा नदी इशारा पातळीच्या बाहेर गेली होती. तर तिची धोका पातळीकडे वाटचाल सुरू होती.

नाशिक, 30 जुलै, 2023 | राज्यातील अनेक भागात सध्या जोरदार पाऊस होताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळे कोकणासह, कोल्हापूर आणि सांगलीमधील नद्यांची पूरस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीला तर पूर आल्याने अनेक ठिकाणी रस्ते बद झाले होते. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे आठवड्यात धरणाचे दोनवेळा स्वयंचलित दरवाजे उघडले होते. ज्यामुळे पंचगंगा नदी इशारा पातळीच्या बाहेर गेली होती. तर तिची धोका पातळीकडे वाटचाल सुरू होती. धोका पातळीला फक्त काही फुट बाकी होते. तोच पावसाने उसंत घेतली आणि राधानगरीचे दरवाजे बंद झाले. त्याचवेळी अलमट्टीचे दरवाजे उघडल्याने कोल्हापूरची स्थिती बिघडली नाही. याचदरम्यान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मी साई चरणी प्रार्थना केल्याने कोल्हापूरला पूर आला नाही असं वक्तव्य केलं आहे. त्यावरून मंत्री छगन भूजबळ यांनी टोला लगावला आहे. पाहा काय म्हटलं आहे भूजबळ यांनी…

 

Published on: Jul 30, 2023 02:29 PM