‘आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भिडे यांच्यासोबत जाणे हे...’, भुजबळ यांचा थेट भाजपला अप्रत्यक्ष सल्ला

‘आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भिडे यांच्यासोबत जाणे हे…’, भुजबळ यांचा थेट भाजपला अप्रत्यक्ष सल्ला

| Updated on: Jul 30, 2023 | 2:04 PM

त्यानंतर राज्यभर वाद निर्माण झाला होता. तर वादग्रस्त वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. त्यानंतर भिडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जेष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 30 जुलै, 2023 | शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी गेल्या दोन दिवसांपुर्वी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर राज्यभर वाद निर्माण झाला होता. तर वादग्रस्त वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. त्यानंतर भिडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जेष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया देताना, भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला ही चांगली गोष्ट असून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असे मत व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर यावेळी त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष सल्लाही दिला आहे. भुजबळ यांनी, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या भिडेंबरोबर जाणे हे राजकारणाच्यादृष्टीनेही आत्मघातकी आहे. तर गांधी यांच्याबाबत असे बोलणं देशातीलच नाहीतर, गुजरातमधील देखील बांधवांना सहन न होणारं असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 30, 2023 02:04 PM