काही आमदार सिल्वर ओकवर? छगन भुजबळ म्हणतात, ‘त्याच काय? दोन-चार आमदार…’
यासाठी दोन्ही गटाकडून मुंबईत मेलाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर यासाठी आमदार आणि खासदारांना व्हीप लागू करण्यात आला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. तर शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून आज राष्ट्रवादी कोणाची यावर फैसला होणार आहे. यासाठी दोन्ही गटाकडून मुंबईत मेलाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर यासाठी आमदार आणि खासदारांना व्हीप लागू करण्यात आला आहे. त्याचदरम्यान आता काही आमदार हे शरद पवार यांच्याकडे परतत आहेत. ते त्यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकवर जात आहेत. यावरून मंत्री छगन भुजबळ यांना विचारलं असता त्यांनी दोन-चार आमदार सोडले तर आमच्याकडे सर्व आमदार आहेत. तर साहेबांनी बोलावलं तर मी ही त्यांना भेटायला जाईन असं मिश्किल वक्तव्य त्यांनी केलं आहे.
Published on: Jul 05, 2023 03:28 PM
Latest Videos