‘या माणसाला अटक केली पाहिजे’; छगन भुजबळ यांची संतप्त प्रतिक्रिया
काँग्रेसकडून या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली असून संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलने केली जात आहेत. तर भिडे यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक, 31 जुलै 2023 | संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसकडून या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली असून संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलने केली जात आहेत. तर भिडे यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी, महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी अतिशय गल्लीच वक्तव्य केलं आहे. समाज सुधारकांची भडव्यांची यादी आहे, असे म्हणत त्यानं त्यात महात्मा फुले आणि म. गांधी त्यांचे नाव घेतले. त्यामुळे भिडे यांच्या मागे बोलवता धनी कोण आहे? याचे देखील विचार करण गरजेचे आहे. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणेमध्ये येत आहेत त्यांच्या कानावर देखील या गोष्टी घातल्या पाहिजेत असेही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर या माणसावर कडक कारवाई करत त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे असेही भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आणखी काय म्हटलं आहे. पाहा या व्हिडिओत