… अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर

| Updated on: Nov 30, 2023 | 3:29 PM

भुजबळ यांनी येवला तालुक्यात नुकसानग्रस्त भागांची पहाणी केली. येथील द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. उद्धस्त बागांच्या पाहणीवेळी भुजबळ शेतावर पोहोचले असता त्यांच्यासमोरच महिला ढसाढसा रडल्याचे पाहायला मिळाले.

Follow us on

नाशिक, ३० नोव्हेंबर २०२३ : राज्यातील गारपीट आणि अवकाळीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे नुकसानग्रस्त शेती पिक पाहणीसाठी तब्बल दीड महिन्यानंतर मतदारसंघात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला तर मराठा समाजाच्यावतीने तीव्र विरोध केल्याचे पाहायला मिळाले. असे असतानाही भुजबळ यांनी येवला तालुक्यात नुकसानग्रस्त भागांची पहाणी केली. येथील द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. उद्धस्त बागांच्या पाहणीवेळी भुजबळ शेतावर पोहोचले असता त्यांच्यासमोरच महिला ढसाढसा रडल्याचे पाहायला मिळाले. तर ही पाहणी सुरू असताना भुजबळ म्हणाले, ही राजकारण करण्याची वेळ नाही, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्याची ही वेळ आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेल्या जिल्ह्यांचे अधिकाऱ्यांसह पंचनामे होतील. अधिकाधिक पंचनामे कसे होतील, सर्वाधिक मदत कशी होईल, ही बघण्याची ही वेळ आहे ,इतकंच नाहीतर पक्ष, राजकारण बाजूला ठेवून यामध्ये सहभागी व्हायला हवे.