प्रकाश आंबेडकर यांना भुजबळ यांचा सवाल, सांगा, काय चुकलं ते?
गाब बंदी करायला सातबारा काय तुमच्या नावावर आहे का? फडणवीस आणि पोलीस यांना सांगणं आहे, की हे बोर्ड तातडीने काढा. देशात कुठेही फिरणे हा अधिकार आहे. डोकी फुटल्यावर तुम्ही जागे होणार का? पोलिसांना विनंती की हे बोर्ड काढा. उगीच दोन चार टकली येतील. अशी दादागिरी करू नका.
नाशिक | 18 नोव्हेंबर 2023 : वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी कुणाचंही आरक्षण न काढता मराठा आरक्षण देता येईल. मात्र योग्य वेळ आल्यावर आपण याची व्याप्ती काय आहे, कशा प्रकारे हा प्रश्न सोडवता येईल हे सांगणार असल्याचं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. त्यावरून भुजबळ यांनी प्रकाश आंबेडकर तुम्ही सांगा, काय चुकलं ते? असा सवाल उपस्थित केला. जे जे समजदार असतील, मग ते वेगळ्या पक्षात असतील, वेगळ्या पदावर असतील त्यांनी आमचे म्हणणे समजून घ्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर तुम्ही सांगा आमचे काय चुकलं ते? आम्ही तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो. आमचं सुद्धा म्हणणं ऐकून घ्या. जर आमचे काही चुकत असेल, तर आम्हाला सांगा. बाकीचे कुणी चुकत असेल तर त्यांनाही सांगा. मला फडणवीस यांनादेखील सांगायचं आहे की आम्हाला sms येतात, धमकी येतात. पण, तक्रार केल्यावर देखील कारवाई होत नाही. गावबंदी का? गावात येऊ द्या. पटलं तर, मतदान करा, नाही तर नका करू असेही भुजबळ म्हणाले.