Chhagan Bhujbal : राजीनाम्याच्या मागणीवर छगन भुजबळ स्पष्टच म्हणाले, … तर मी एक क्षण सुद्धा थांबणार नाही

| Updated on: Dec 01, 2023 | 4:29 PM

मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडावं, भाजपचे नेते आणि शिंदे सरकारमधील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी असं वक्तव्य केल होतं. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, मला आमदारकी, मंत्रिपद याचं अप्रूप नाही.

Follow us on

कर्जत, १ डिसेंबर २०२३ : मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडावं, भाजपचे नेते आणि शिंदे सरकारमधील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी असं वक्तव्य केल होतं. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, मला आमदारकी, मंत्रिपद याचं अप्रूप नाही. गेल्या ३५ वर्षांपासून ओबीसीचं काम सुरू आहे ते तसंच सुरू राहणार ते सोडणार नाही. राजीनामा द्या असे म्हणतात, तुम्ही तुमच्या नेत्यांना सांगा आणि त्यांचा एक मेसेज आला की राजीनामा द्या, त्यानंतर मी एक क्षण सुद्धा थांबणार नाही, अशी ठाम भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली. तर मराठा आरक्षणाविरोधात असल्याची प्रतिमा तयार केली जात आहे, या प्रश्नावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आधीपासूनच माझी भूमिका आहे. फक्त त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये, असं माझं म्हणणं आहे. ३७४ जाती-जमाती ओबीसी प्रवर्गात आहेत. पहिलेच ओबीसीमध्ये असलेल्यांना त्याची कमतरता भासत आहे. त्यात मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याची मागणी होतेय, त्याला माझा विरोध असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.