पवार यांच्या नाशिक दौऱ्यावरून भुजबळ म्हणाले, ‘माझं शक्तिप्रदर्शन’

पवार यांच्या नाशिक दौऱ्यावरून भुजबळ म्हणाले, ‘माझं शक्तिप्रदर्शन’

| Updated on: Jul 08, 2023 | 12:34 PM

अजित पवार यांच्या बंडात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार सभा घेणार आहेत. तसेच ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्या या बंडखोरांविरोधात पवार यांनी दंड थोपटले आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. तर अजित पवार यांच्या बंडात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार सभा घेणार आहेत. तसेच ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्या या बंडखोरांविरोधात पवार यांनी दंड थोपटले आहेत. याचदरम्यान भुजबळ यांनी देखील शक्तिप्रदर्शन करत शनिवारी नाशिकमध्ये रॅली काढणार आहेत. यावरून भुजबळ आणि पवार यांच्यात आता राजकारण चांगलेच तापलेलं आहे. यावेळी पवार यांच्या या दौरा आणि सभेवरून छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पवारांचे माझ्यावर प्रेम आहे. म्हणून ते येवल्यात येत आहेत. येथे सभा घेत आहेत असल्याचं म्हटलं आहे. तर शक्तिप्रदर्शन वैगेरे काही नाही. हे माझं नेहमीचं जाण असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 08, 2023 12:33 PM