संजय राऊत यांना आता कोणी सीरिअस घेत नाही, सरकारमधील मंत्र्यानं उडवली खिल्ली
आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर गुंड आणि राजकीय नेत्यांच्या संबंध यावर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू... संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर संजय राऊत यांना आता कोणी सीरिअस घेत नाही, असे वक्तव्य करून राऊतांना कुणी लगावला खोचक टोला?
मुंबई, दि. 6 फेब्रुवारी 2024 : आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर गुंड आणि राजकीय नेत्यांच्या संबंध यावर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू असताना आज मंगळवारी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘महाराष्ट्रात गुंडा राज: गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने..’, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले. यावर सरकारचे मंत्री दादा भुसे यांना सवाल करण्यात आला असता त्यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. संजय राऊत यांना आता कोणी सीरिअस घेत नाही, असे वक्तव्य करून दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्या ट्वीटवर भाष्य केले आहे.