धक्कादायक! शिंदे गटाच्या मंत्र्याला धमकी, खंडणी उकळण्याचा प्रयत्न
या धमक्यांप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. याचदरम्यान आता आणखी एका मंत्र्याला धमकी आल्याचं तर खंडणीची मागणी झाल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई,18 जुलै 2023 | गेल्या काही महिन्यांपासून राजकीय नेत्यांना धमकी येण्याचे प्रकार वाढले आहे. याच्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, मंत्री धनंजय मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री छगन भुजबळ यांनाही धमकी मिळाली आहे. या धमक्यांप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. याचदरम्यान आता आणखी एका मंत्र्याला धमकी आल्याचं तर खंडणीची मागणी झाल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मंत्री दीपक केसरकर यांना धमकी आली असून या प्रकरणी मलबार हिल पोलिसाकंडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर प्रदीप भालेकर असे आरोपीचे नाव असून आरोपीने खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तर याबाबत मिळालेली माहिती अशी की, भालेकर यांने केसरकर यांच्या कार्यालयातील एकाकडे मदतीची मागणी केली होती. तर त्याला केसरकर यांनी काही मदत देखील केली होती. मात्र ती थांबल्याने भालेकर याने खंडणी मागितली. ज्यावरून त्याप्रकरणी केसरकर यांच्या कार्यलयाकडून पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.