‘स्वत: चोर, त्यामुळेच दुसऱ्या चोराला ओळखतो’; नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कुणी केली टीका

‘स्वत: चोर, त्यामुळेच दुसऱ्या चोराला ओळखतो’; नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कुणी केली टीका

| Updated on: Aug 23, 2023 | 11:46 AM

अजित पवार आणि त्याच्यासोबत ३० एक आमदार हे भाजप-शिंदे सरकारमध्ये गेले आहेत. ते आता सत्तेत गेले आहेत. त्यामुळे अजित पवार आणि त्यांच्या गटावर काँग्रेस नेत्यांकडून टीका होत आहे.

नागपूर : 23 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसापासून अजित पवार गटाला काँग्रसकडून टार्गेट केलं जात आहे. तर काँग्रेस नेते हे थेट अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत. तसेच अजित पवार गटावर टीका करताना त्यांना चोर असे संबोधत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पवार गट सत्तेत जाण्याचं कारण सांगताना चोऱ्या लपवण्यासाठी शिंदे, पवार गट सत्तेत गेला अशी टीका केली होती. तर त्यांच्या या टीकेची री प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील ओढत तिच टीका केली होती. त्यानंतर अजित पवार गटाकडून आता पलटवार करण्यात आला आहे. नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांवर मंत्री धर्मरावबाबा आत्रम यांनी जशास तसे उत्तर देताना, चोर म्हणजे नेमकं काय? असा सवाल केला आहे. तर स्वत: चोर असतील म्हणून त्यांना आमच्या गटातील लोक चोर दिसत असतील. चोरांनाच दुसरे चोर दिसतात. तर ते स्वत: चोर आहेत का आधी पडताळून पाहावं आणि त्यानंतर आम्हाला चोर म्हणावं असा सल्ला दिला आहे.

 

Published on: Aug 23, 2023 11:46 AM