सरकारनं वायदा पाळला नाही, जरांगे पाटील यांची गिरीश महाजन यांच्यावर कोणत्या प्रश्नांची सरबत्ती?

| Updated on: Oct 26, 2023 | 11:27 AM

tv9 Marathi Special Report | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. सरकारच्या वतीनं मंत्री गिरीश महाजनांनी जरांगे पाटलांची मनधरणी केली. मात्र जरांगे पाटील आमरण उपोषणावर ठाम आहेत. सरकारनं वायदा न पाळल्यानं जरांगे पाटलांनी गिरीश महाजनांवर प्रश्नांवर प्रश्न विचारले..

Follow us on

मुंबई, २६ ऑक्टोबर २०२३ | सरकारनं शब्द दिला होता त्यावर आम्ही विश्वास ठेवला. मग आमचं काय चुकलं, असा प्रश्न जरांगे पाटलांनी सरकारला केलाय. सरकारच्या वतीनं मंत्री गिरीश महाजनांनी जरांगे पाटलांची मनधरणी केली. मात्र जरांगे पाटील आमरण उपोषणावर ठाम आहेत. सरकारनं वायदा न पाळल्यानं मनोज जरांगे पाटलांनी गिरीश महाजनांवर प्रश्नांची सरबत्ती केली. अनेक प्रश्नांवर महाजनांकडे उत्तर नव्हतं. पहिला मुद्दा होता जालन्याच्या आंदोलकावरील दाखल गुन्ह्यांचा. खुद्द मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या समोरच गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आज त्याला ४२ दिवस उलटल्यानंतरही गुन्हे मागे घेतले गेलेले नाहीत. दुसरा मुद्दा सरकारच्या जाहिरातीचा. गिरीश महाजनांनी सारथीद्वारे किती फायदा झाला याची आकडेवारी सांगितली. मात्र जरांगे पाटलांनी त्या आकडेवारीच्या विश्वासहर्तेवरच प्रश्न उपस्थित केले. बघा नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?