VIDEO | राष्ट्रवादीत भाकरी फिरवी, मात्र अजित पवार यांना काहीच नाही; पवार यांच्या खेळीवर भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य
अजित पवार यांच्यावर एका प्रकारे अन्यायच करण्यात आल्याचं भाजपचे अनेक नेते आता म्हणताना दिसत आहेत. याचदरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी यावरूनच आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन नुकताच दिल्लीत पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात नवीन नियुक्त्या करत सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली. यावेळी त्यांनी इतरही काही नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्ती केली. मात्र विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना डावलले. यावरून राज्यात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. तर अजित पवार यांच्यावर एका प्रकारे अन्यायच करण्यात आल्याचं भाजपचे अनेक नेते आता म्हणताना दिसत आहेत. याचदरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी यावरूनच आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अजित पवार यांना डावलण्याचा मुद्दा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा असेल. तो त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे. मात्र आमचा त्यांच्याशी संपर्क नाही, असे महाजन यांनी म्हटलेलं आहे.