‘दादा शब्दाचे पक्के, पण आता आमच्या सोबत’; अजित पवार यांच्या कौतूकावर महाजन यांची प्रतिक्रिया

‘दादा शब्दाचे पक्के, पण आता आमच्या सोबत’; अजित पवार यांच्या कौतूकावर महाजन यांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 06, 2023 | 3:10 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्री गिरीशी महाजन यांचे कौतूक केले. त्याचबरोबर महाजन यांचे दंडही तपासले. यावरून सध्या चर्चा रंगली आहे. यावरून महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे, 06 ऑगस्ट 2013 | येथे आयोजित मोफत महाआरोग्य शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्री गिरीष महाजन यांचे कौतूक केले. त्याचबरोबर महाजन यांचे दंडही तपासले. यावरून सध्या चर्चा रंगली आहे. यावरून महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाजन यांनी, आज मैत्री दिन आहे. पण अजित पवार आणि माझ्यात फार जुना राजकीय वैर होता. अजित पवार यांनी माझ्या मतदार संघासाठी एक रूपयाही दिला नाही. तर बोलून ही दाखवलं आणि दिला देखील नाही. दादा हे शब्दाला पक्के आहेत. पण आता आम्ही मित्र झालो आहोत. आम्ही आता सोबत आहोत. तर ते आता माझं कौतूक करत होते. आम्ही कधी भेटलो तर ते माझा दंड पकडून बघायचे आणि त्याबद्दल विचारायचे देखील. त्यावर मी त्यांना व्यायामाबद्दल सांगत असे असं महाजन यांनी म्हटलं आहे. पाहा आणखी काय महाजन यांनी म्हटलं आहे, ते….

Published on: Aug 06, 2023 02:32 PM