Gulabrao Patil : मला त्यावर बोलायचं नाही; गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंबद्दल असं का म्हणाले?
आयोगात पक्षाचा संघटनात्मक पेच फसलेला असताना ठाकरे गटापुढे आणखी एक संकट उभे राहिले आहे. यावरून शिंदे गटाचे नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांना वाचारणा केली असता त्यांनी त्यावर प्रतिक्रीया दिली आहे.
जळगाव : राज्यातील सत्ता संघर्षावर तारीख पे तारीख सुरू आहे. आता १७ जानेवारीला यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. यादरम्यान ठाकरे गटासमोर आणखी एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाची लढाई सुरू असतानाच उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आली आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत ही 23 जानेवारीला संपणार आहे.
यावरून सध्या उद्धव ठाकरे गटात काय करावे असा प्रश्न निर्माण झाल्याची सद्य स्थितीत दिसत आहे. तर आयोगात पक्षाचा संघटनात्मक पेच फसलेला असताना ठाकरे गटापुढे आणखी एक संकट उभे राहिले आहे. यावरून शिंदे गटाचे नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर प्रतिक्रीया दिली आहे.
23 जानेवारी 2023 ला उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची पाच वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानंतर त्यांचे हे ही पद संपुष्टात येईल. यावरून पाटील यांना वाचारणा केली असता. आपल्याला यावर काहीच बोलायचं नाही. तर सत्तासंघर्षावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे शहाण्या माणसाने त्यावर बोलू नये.
तर आमची बाळासाहेबांची शिवसेना असल्याने तुम्ही त्यावर विचारा. तर येत्या काळात आमच्या या शिवसेनेला मजबूत करण्यासाठी आम्ही राज्याचा दौरा करणार आहोत. पक्ष बळकट करणार आहोत.