शिंदे -भाजप सरकारमध्ये पुन्हा नाराजी नाट्य; अपेक्षित जिल्ह्याचे पालकमंत्रीपद न मिळाल्यानं मंत्री नाराज?
अपेक्षित जिल्ह्याचं पालकमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे, फडणवीस सरकारमधील काही मंत्री नाराज असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर गेले अनेक दिवस पालकमंत्रीपदाचं (guardian minister) वाटप रखडलं होतं. यावरून विरोधकांनी शिंदे, फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारवर जोरदार टीका केली. अखेर शनिवारी पालकमंत्रीपदाच्या वाटपाला मुहूर्त मिळाला. शिंदे सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. यातील अनेक मंत्र्यांना दोन ते तीन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र अपेक्षित जिल्ह्याचं पालकमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे, फडणवीस सरकारमधील काही मंत्री नाराज असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारात मिळालेल्या खात्यावरून शिंदे गटातील काही मंत्री नाराज असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता अपेक्षित जिल्ह्याचं पालकमंत्रीपद न मिळाल्यानं काही मंत्री नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
Published on: Sep 25, 2022 07:54 AM
Latest Videos